मुंबई महापालिका बरखास्त करा


मुंबई - भिंत कोसळून मालाड येथे मृत्यू झाल्याबद्दल दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व  मुंबई महापालिका तातडीने बरखास्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.
मुुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे घडलेल्या अनेक दुर्घनेत अनेकांचे बळी गेले आहे. मुंबई महापालिका पावसाची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरली आहे. अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होत असून भ्रष्टाचार बोकाळला आहे. मुंबईत झालेल्या नाले सफाई बाबत दौर्‍यांचाही काही उपयोग झालेला आहे. त्यामुळै महापालिकेवर प्रशासक नेमा असे म्हणत आक्रमक झालेल्या अजित पवार यांनी  मुंबई महानगरपालिकाच बरखास्त करा अशी मागणी केली. कल्याण, ठाणे, मुंबईत अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post