
माय नगर वेब टीम
बर्मिंगहॅम - आज मंगळवारी (2 जुलै) भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. एजबॅस्टन मैदाावर होणार्या या सामन्यात विजय मिळवून भारताल सेमीफायनलमध्ये जागा निश्चित करण्याची संधी आहे. भारतीय संघाचे 7 सामन्यात 11 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात टीम इंडिया दुस़र्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा संघ 13 गुणांसह सेमीफायनल मध्ये पोहोचेल. पण बांगलादेशविरुद्ध होणार्या या सामन्यात भारताला सावध राहणे गरजेचे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या अनके कमकूवत बाजू समोर आल्या आहेत. विशेषत: महेंद्र सिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या फलंदाजीवर अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.
वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 3 सामने झाले आहेत. त्यापैकी एक बांगलादेशने जिंकला आहे तर दोनमध्ये सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 2007मध्ये या दोन्ही संघात वर्ल्ड कपमधील पहिला सामना झाला होता. त्यात बांगालादेशने 5 गडी राखून विजय मिळवला होता.
Post a Comment