माय नगर वेब टीम
मुंबई - मुंबईसह राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. जोरदार पावसामुळे मुंबईसह उपनगरात पावसाचे पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासानाने मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यात सुटी जाहीर केली आहे. तसेच कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाने झोडपून काढल आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या पावसाची सतंतधार आज सकाळी ही सुरूच होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यानीं याबाबत स्वत:च ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सीएमओ महाराष्ट्र व शिवसेनेला टॅग करत करुन दाखवले अशी टॅगलाईन दिली.
Post a Comment