मुंबईसह उपनगरातही मुसळधार पाऊस ; शाळा- कॉलेजांना सुट्टी तर परिक्षा रद्द




माय नगर वेब टीम

मुंबई - सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगरीय भागात पावसाने पुन्हा एकदा चांगला जोर धरला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवरही पाणी साचल्यामुळे मुंबईची लाईफलाईन ही विस्कळीत झाली आहे. पुढील काही तास ही पावसाची हीच परिस्थिती पाहता मुंबईसह तीन जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच सरकारी कार्यालयांनाही मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागात असणारी शाळा महाविद्यालय आज बंद राहणार असल्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्टिटरव सांगितले आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

मुंबई विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यातच आज मंगळवारी होत असलेल्या विद्यापीठाच्या वतीने घेत असलेलया परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहे. या परिक्षेचे बदलेले वेळापत्रका विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post