जलशक्ती अभियानाची कामे ऑगस्‍ट अखेर पूर्ण करा - जिल्हाधिकारी


माय नगर वेब टीम 
अहमदनगर - जलशक्‍ती अभियांनातर्गत जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगाव, शिर्डी आणि देवळालीप्रवरा या नगरपरिषदेचा समावेश आहे. या नगर परि‍षदेच्‍या हद्दीतील विहिरी आणि विंधनविहीरी, पुर्नभरणरेनवॉटर हार्वेस्टींग आणि वृक्षा लागवडी कामाची जी उद्दिष्‍टे निश्चित केरण्‍या आली आहेत. ती सर्व कामे दिनांक 30 ऑगस्‍ट 2019 पर्यत पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात, अहमदनगर येथे जलशक्‍ती अभियानांतर्गत नगरपरिषदेच्‍या मुख्‍याधिका-यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र वाघ, नगरपालिका शाखा जिल्‍हा प्रशासन अधिकारी शरद घोरपडे, व वरील नगरपरिषदेचे मुख्‍याधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी श्री द्विवेदी यांनी संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता,राहुरी, शिर्डी आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेच्‍या रेनवॉटर हार्वेस्टींग, परंपरागत जलस्त्रोतांचे नूतनीकरण, बोअरवेल व विहीर पुर्नभरण आणि वृक्षलागवड आदी बाबींवर सविस्‍तर चर्चा केली.

जलशक्‍ती अभियानाची माहिती नगरपरिषदेच्‍या स्‍तरावर होण्‍यासाठी नगराध्‍यक्षां समवेत महासभा घेऊन जलदिंडी काढण्‍यात यावी अशा सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. तसेच नगर परिषदेनी केलेल्‍या कामाची मा‍हिती संकेतस्‍थळावर अपलोड करावीत व जलशक्‍ती अभियांनाची सर्व कामे दिनांक 30 ऑगस्‍ट 2019 अखेरपर्यत पूर्ण करण्‍याच्‍या सूचना जिल्‍हाधिकारी द्विवेदी यांनी यावेळी दिल्‍या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post