पाच दिवसांत साईच्या झोळीत सहा कोटीचे दान




माय नगर वेब टीम
शिर्डी  – साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्यावतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये पाच दिवसांत रोख सहा कोटी 24 लाख 11 हजार 243 रुपये इतकी देणगी साईबाबाच्या झोळीत प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

 मुगळीकर म्हणाले, शनिवार दि. 13 जुलै 2019 ते बुधवार दिनांक 17 जुलै 2019 या पाच दिवसांच्या कालावधीत आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये एकूण 6 कोटी 24 लाख 11 हजार 243 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. यामध्ये दक्षिणापेटी मोजणी रुपये 2 कोटी 12 लाख 99 हजार 158, देणगी काऊंटर 1 कोटी 7 लाख 3 हजार 351 रुपये, डेबीट-क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक-डी.डी., मनीऑर्डर देणगी आदीद्वारे रुपये 1 कोटी 3 लाख 8 हजार 180 रुपये, सोने 738.815 ग्रॅम रक्कम रुपये 21 लाख 44 हजार व चांदी 8436 ग्रॅम रक्कम रुपये 2 लाख 32 हजार, 17 देशांचे परकीय चलन अंदाजे रुपये 8 लाख 94 हजार 444.50 यांचा समावेश आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कालावधीत 2 लाखाहून अधिक साईभक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश असून ऑनलाईन व सशुल्क दर्शन आरती पासेसद्वारे 67 लाख 45 हजार रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच उत्सव कालावधीमध्ये साई प्रसादालयामध्ये 3 लाखाहून अधिक साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. दर्शन रांगेतून 2 लाख 10 हजार 400 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत 1 लाख 78 हजार 146 प्रसादरुपी लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post