गेल्या वर्षी विठ्ठलाच्या दर्शनाला येता आलं नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत


माय नगर वेब टीम
पंढरपूर -  गेल्या वर्षी काही कारणामु्ळे पंढरीत विठ्ठलपूजा करता आली नाही याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

आषाढी एकादशी निमित्त आज पहाटे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाचं संकट दूर व्हावं यासाठी विठुरायाला साकडं घातलं आहे.

माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, दुष्काळाच्या फेऱ्यात माझा शेतकरी अडकलाय तो सुखी व्हाव्हा, असं साकडं विठ्ठलाला घातलं असल्याचं फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  आणखी पाच वर्ष जनतेची सेवा करण्यासाठी संधी मिळू दे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post