बाबरी प्रकरण : नऊ महिन्यात निर्णय द्या


माय नगर वेब टीम 
नवी दिल्ली : बाबरी खटल्याची सुनावणी घेणा-या विशेष न्यायाधीशांनी पुढील नऊ महिन्यांत निकाल द्यावा, असे निर्देश आज सुप्रीम कोर्टाने दिले.

बाबरी खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नऊ महिन्यांच्या आत या खटल्याचा निकाल देण्यात यावा, असे आदेश यादव यांना कोर्टाने दिले. यादव हे ३० सप्टेंबरला निवृत्त होणार होते. खटल्याचे कामकाज संपवण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे यादव यांनी गेल्या सुनावणीदरम्यान कोर्टात सांगितले होते. त्यावर निकाल देईपर्यंत विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत काय करता येईल, याचे उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला दिले होते. या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने विशेष न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवला. तसेच या खटल्याचा नऊ महिन्यांत निकाल द्यावा, असे आदेश त्यांना दिले.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांविरोधात हा खटला सुरू आहे. या प्रकरणाची सुनावणी लखनऊमधील ट्रायल कोर्टाचे विशेष न्यायाधीश एसके यादव करत आहेत. ते ३० सप्टेंबर २०१९ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या अगोदर त्यांनी सर्वोच्च न्यायालयास पत्र लिहून कळवले होते की, बाबरी प्रकरणाच्या खटल्याची सुनाणीची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी आणखी कालावधीची आवश्यकता आहे.

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत न्यायाधीश एसके यादव यांचा कार्यकाळ वाढण्याच्या सुचना केल्या. तसेच न्यायमूर्ती आरएफ नरीमन आणि सुर्यकांत यांच्या पीठाने हे देखील म्हटले आहे की, प्रकरणाच्या सुनावणीत पुराव्यांचे चित्रीकरण सहा महिन्यात पूर्ण केले जावे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post