माय नगर वेब टीम
अहमदनगर - विखे कारखान्याचे चेअरमन संचालक यांनी आमच्यावर दाखल केलेला बदनामीचा खटला उच्च न्यायालयाने रद्द केल्याची माहिती एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व अरुण कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विखे सहकारी कारखाण्याचे सभासद या नात्याने आम्ही सन 2011 मध्ये नगर येथे पत्रकार परिषद घेतली होती. विखे गळीतील येणाऱ्या ऊसाच्या वाजनात फेराफार करून खोट्या वजन स्लिप देतो. तसेच रिकव्हरी बाबत आम्ही आरोप केले होते. दुसऱ्या दिवशी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. वृत्तपत्रात कारखाण्याची बदनामी मजकूर प्रसिद्ध झाल्यामुळे लोणी पोलीस ठाण्यात आमच्या विरोधात कारखाण्याची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही वर्षपासून हा खटला राहता न्यायालयात सुरू होता. तो खटला रद्द करावा. यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होत प्रवरा साखर कारखाने दाखल केलेल्या गुन्हा रद्द केल्याचे एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व अरुण कडू यांनी नगर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
Post a Comment