महाराष्ट्र काँग्रेसची धुरा बाळासाहेब थोरातांकडे, प्रदेशाध्यक्षपदी झाली नियुक्ती




माय नगर वेब टीम
मुंबई - राज्याच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मोठ्या पदावरील नेत्यांनी आपापले राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठवले होते. त्यात अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. त्यामुळे या नव्याने नियुक्त्या केल्या जात आहे.

अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदार संघातून दारुण पराभव झाला होता. पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.  दरम्यान, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, बसवराज पाटील, विश्वजीतक कदम आणि  मुझफ्फर हसन यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post