इसळकच्या सरपंचपदी बाबासाहेब गेरंगे बिनविरोध
माय नगर वेब टीम
अहमदनगर- इसळक (ता. नगर ) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबासाहेब गेरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
नगर तालुक्यातील इसळक येथे नुकतीच पाच जागेची पोट निवडणुक पार पडली. या निवडणुकीत जनसेवा पॅनल ने चार जागावर विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत गयाबाई खामकर, योगिता कांबळे, इंदुबाई चोथे, मनीषा तांबे हे उमेदवार विजयी झाले. सरपंचपदाच्या निवडीसाठी सर्ववसाधार सभा बोलवण्यात होती. या मध्ये सरपंचपदाासाठी बाबासाहेब गेरंगे यांच्या नावाची सूचना उपसरपंच अमोल शिंदे यांनी केली. या नावासाठी सर्व सदस्यांनी
एकमताने सहमती दर्शविल्यामुळे गेरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या बिनविरोध निवडीसाठी सुखदेव बळवंत गेरंगे, दामोधर गेरंगे, किसन चव्हाण, पोपट खामकर, उत्तम खामकर, मनोज गेरंगे, दिनकर चोथे, नानासाहेब गेरंगे, संदिप, शिवाजी गेरंगे, सुरेश शिंदे, नंदू शिंदे, किसन गेरंगे, बाजीराव खामकर, गोरख गाढे, दिगंबर शिंदे, अशोक चोथे, मच्छिंद्र शिंदे, सुरेश गाढे, राजेंद्र सुखदेव गेरंगे, श्रीपती शिंदे, अनिल जाधव, संदिप गेरंगे सर्वानी मोलाचं सहकार्य केले.
Post a Comment