विधानसभेसाठी मतदार याद्यांचा प्रोग्राम जाहीर ; १९ ऑगस्ट ला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध



माय नगर वेब टीम

अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 जानेवारी 2019 या अहर्त दिनांकावर आधारित मतदार याद्या चा दुसरा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला.


दरम्यान त्यानुसार महिनाभरात मतदार याद्या अद्ययावत करून अंतिम मतदार यादी 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करावयाची आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी ज्या मतदारांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे. परंतु त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत. अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे. मतदार यादीतील मयत दुबार व स्थलांतरीत मतदारांच्या नावांची वगळणी करणे निर्दोष अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

सोमवारी दिनांक 15 या कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी प्रसिद्धी करावयाची असून त्यानुसार जावे स्वीकारायच्या आहेत. चार दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. त्यानंतर दाखल दावे व हरकती निकाली काढून उपजिल्हा निवडणूक अधिकारी किंवा यादी निरीक्षकाकडून मतदार यादीची विशेष तपासणी होणार आहे. त्या नंतर 11 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. ही यादी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ठरवली जाणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post