ती टोळी जेरबंद ; सव्वा कोटीचा मुद्देमाल जप्त



माय नगर वेब टीम

अहमदनगर -

पंजाब मधून तामिळनाडु राज्यात वाहतुक करण्यात येणारे रेकटीफाईड स्पिरिट टँकरचे सील तोडून, चोरून अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, राहुरी तालुक्यात विक्री करताना नऊ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने रंगेहात पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सव्वा कोटी चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

याबाबत चे सविस्तर वृत्त असे की पतियाळा पंजाब येथून तामिळनाडू राज्यात रेकटीफाईड स्पिरिट घेऊन जाणारे तीन टँकर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी ,राहाता येथे सील तोडून विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली त्यानुसार भरारी पथक क्रमाक दोन यांनी विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत रक्‍टीफाईड स्पिरीटचे तीन टँकर सह एक टाटा सुमो व एक इन्हेव्हा असा माल ताब्यात घेतला तर नऊ आरोपींना अटक करण्यात आली .


सोडीराम सरदारुराम लालके, नरेंद्रसिंग शकरमसिंग, मनजिदरसिंग गुरमेजसिंग गोमन, परमेश्वर येडुबा गुंजाळ, सुनिल रामभाऊ वाघ, राकेशकुमार केबलप्रसाद दाहिया, पुष्येंद्र मुकेश दाहिया, चंद्रकांत शाम पवार, भाऊसाहेब मधुकर गोरे या आरोपींच्या ताब्यातुन तिन टॅकर व दोन चार चाकी वाहने, ८९२०० बल्क लिटर अल्कोहोल असा एकुण १२०५५८८२/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द मुंबई दारुबंदी कायद्या १९४९ चे सुधारित अधिनियम २००५ चे ६५ (औ ( फ ) ( ई ) ८०,८३,९० व १०८ नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस राहुरी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कौतुक केलं आहे . ही कारवाई संजय सराफ, नंदकुमार जाधव, भैयासाहेब घोरतळे, अनिल पाटील, आण्णासाहेब बनकर निरीक्षक तसेच एस.आर.कुसळे प्रभारी निरीक्षक भरारी पथक क्र.२ श्रीरामुपर. पी.बी.अहिरराव, उत्तम बर्डे, होले दुय्यम निरीक्षक व रुपेश चव्हाण सहाय्यक दुय्यम निरीक्षक, जवान सर्वश्री कदम, वाघ, कंठाळे, साळवे, दिपक बर्डे, चत्तर, उके, मोजमुले, शेख, गदादे, कासुळे वहान चालक यांनी मदत केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास एस.आर. कुसळे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.२ श्रीरामपुर हे करीत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post