पाण्यासाठी रास्तारोको ; माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह 1200 जणांवर गुन्हे दाखल
माय नगर वेब टीम
अहमदनगर -
सोनई -करजगावसह 18 गावांची बंद पडलेली पाणी योजना सुरू करण्यासाठी शनिवार 13 जुलै रोजी गैर कायद्याची मंडळी जमवून सोनईत (राहुरी- शनिशिंगणापूर महामार्गावर) मध्ये बेकायदेशीरपणे रास्ता रोको केल्याप्रकरणी माजी आमदार शंकराव गडाख यांच्यासह सात व इतर अनोळखी सुमारे बाराशे आंदोलकांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब देविदास मोरे यांच्या फिर्यादीनुसार माजी आमदार शंकरराव गडाख, दादासाहेब वैरागर, संदीप कुसळकर सर्व रा.सोनई खलील इनामदार (खेडलेपरमानंद), किरण जाधव (शिरेगाव), गणेश तांदळे (गणेशवाडी)व संजय जंगले (पानेगाव) आदींसह अनोळखी सुमारे एक हजार ते बाराशे जणांवर बेकायदा गैरकायद्याची मंडळी जमविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योजना बंद असल्याने पाण्यासाठी संतप्त सोनईकरांनी योजना सुरळीत चालू करण्याच्या मागणीसाठी लाभधारक गावांनी एकत्रितपणे रास्तारोकोच्या माध्यमातून पाणी सुरू करण्याची मागणी केली होती. दरम्यान जीवन प्राधिकरण व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून राहुरी-सोनई रस्त्यावर वाहतूक अडवून विनापरवाना बेकायदेशीर रास्तारोको केल्याप्रकरणी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नको कॉन्स्टेबल चवळी करत आहेत.
Post a Comment