पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तडकाफडकी निलंबित




माय नगर वेब टीम 
अहमदनगर -
पैसे घेतानाच्या ‘व्हायरल व्हिडिओमुळे तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काल रात्री ही कारवाई केली. 

सांगळे हे वाहतूक शाखेत असताना त्यांनी एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन सांगळे याची सखोल चौकशी केली. त्यानंतर नंदकुमार सांगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. काल रात्री उशिरा हा आदेश बजाविण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post