नगरमध्ये चार इंच पाऊस ; जिल्ह्यात सर्वदूर हजेरी
माय नगर वेब टीम
अहमदनगर
नगर शहरासह जिल्ह्यात शनिवारी पाऊसाने दमदार हजेरी लावली. बऱ्याच दिवसानंतर पावसाने नगरकरांना झोडपून काढले. अनेकांच्या घरात पाणी शिरले. नगरमध्ये चार इंच पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. शनिवारी एका दिवशी 425 मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला तर नगरमध्ये 108 मिलिमीटर पाऊस झाला.
गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने ओढ दिली होती. परंतु गेल्या दोन दिवसापासून पावसाने जिल्ह्यातील ठिकाणी दमदार हजेरी लावली. तसेच अजून दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शनिवारी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला. नगर, नेवासा येथे धुवांधार पाऊस झाला. नगरमधील नालेगाव मंडळात 108 मिलिमीटर, सावेडी 117, भिंगार 80, नागपूर 82, नेवासातील नेवासा खुर्द 80, पारनेर मध्ये वाडेगव्हान मंडलात 82 मिलिमीटर पाऊस झाला.
तसेच केडगाव, चास, वाळकी, चिंचोडी पाटील मंडलात दमदार पाऊस झाला. अजून दोन दिवस जिल्ह्यात दमदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे खरीपाला जीवदान मिळाले असून बळीराजा सुखावला आहे.
Post a Comment