पारनेर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये कलगीतुरा
भाजप पदाधिका-यांचा अनुपस्थित पार पडणार आदित्य संवाद मेळावा ....?
माय नगर वेेेब टीम
पारनेर - पारनेर मधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचे उपसभापती विजय औटी कायमच तुच्यतेची वागणूक देत असल्याचा आरोप करत पारनेर भाजपा पदाधिकाऱ्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जण आशीर्वाद यात्रेवर बहिष्कार टाकला आहे.
पारनेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक (दि 20 जुलै) रोजी सुपा येथील शासकीय विश्रामगृहामदध्ये पार पडली. उपसभापती औटी यांच्याकडून तुच्छ तेची वागणूक मिळत असल्याने सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून सदर कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये भाजप कार्यकर्त्यांना नेहमीच वेगळी वागणूक देण्यात येते. त्याचबरोबर गेली पाच वर्ष सर्व शासकीय कार्यक्रमात स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना कधीच स्थान दिलेले नाही.
त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत गावपातळीवर वरील भाजप कार्यकर्त्यांना यंञेणेत समाविष्ट करून घेतलेले नाही. या वागणकीमुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आले आहे.
Post a Comment