पुन्हा येईल
माय नगर वेब टीम
अहमदनगर
पुन्हा येईल
येतील पुन्हा मुसमुसलेले
नैऋत्येच्या कुशीतून वारे
उडवीत जातील मेघ येथून
जीर्ण खोडावर उदक फवारे
वाळलेल्या फांदीलाही
फुटतील पुन्हा घुमारे
हिरव्या हिरव्या ताटांवरती
डौलाने डोलतील तुरे
दुःख वेदना कधी काळीच्या
जातील मेघाचे बोट धरुनी
भोग इथले दुष्टचक्रातले
गिळून घेईल सारे अवनी
भरुन घेईल आसमंत पुन्हा
मृदगंधाने आपली ओंजळ
फुलाफुलातून उधळून देईल
चहूदिशांना प्राजक्त दरवळ
ओसरतील पुन्हा इथली
तप्त रखरखणारी उन्हे
मातीमधे विरुन जातील
वाळलेली जुनाट पाने
पुन्हा बसतील तारेवरती
रांगा धरूनी रानपाखरे
पुन्हा हुंगुनी पानवाऱ्याला
उधळतील रानी खोंड वासरे
कवि- नवनाथ वाळके
बाबुर्डी बेंद
अहमदनगर
Post a Comment