कोळपेवाडी दरोड्यातील कुख्यात गुंड पपड्याच्या भावासह महिलेला अटक
माय नगर वेब टीम
कोपरगाव - तालुक्यातील बहुचर्चित कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून सरफाची हत्याप्रकरणातील दोन आरोपींना औरंगाबाद येथे जाऊन पकडण्यात आले. ही कारवाई नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. श्रीमंत ईश्वर काळे (वय 45, राय मिटमीटा, औरंगाबाद) व प्रिया जीतू भोसले (वय 30, रा.जोगेश्वरी, वाळूंज एमआयडीसी, औरंगाबाद) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कोळपेवाडी (ता.कोपरगाव) येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दि.8 ऑगस्ट 2018 मध्ये दरोडा टाकण्यात आला होता. या दरोड्यात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारकरून सराफ शाम धाडगे यांची हत्या सोन्याचे व चांदीचे दागिणे लुटून नेले होते. या दरोडाप्रकरणाचा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार व त्याच्या पथकातील अधिकारी व पोलिस कर्मचार्यांनी या घटनेचा अधिक तपास करीत, पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ महादू उर्फ महादेव उर्फ गणपती काळे उर्फ तुकाराम चव्हाण (वय 55 रा. सुदर्शननगर, वर्धा) यांच्यासह टोळीतील 16 आरोपी व चोरीचे सोने घेणारे तीन सरफांना असे एकूण 19 आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. यापैकी फरार आरोपींचा शोध सुरु असतानाच फरार आरोपी श्रीमंत्या काळे व प्रिया भोसले हे मिटमीटा (जि.औरंगाबाद) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी नगर व औरंगाबाद स्थानिक गुन्हे जाऊन दोन्ही आरोपींना पकडले. पुढील कार्यवाहीसाठी दोन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांचा ताब्यात दिले.
आरोपी श्रीमंत ईश्वर काळे हा पपड्या काळे याचा सख्खा चुलत भाऊ असून, पपड्या काळे याचे टोळीतील प्रमुख साथीदार आहे. श्रीमंत काळे याचेवर चंद्रपूर शहर, कोतवाली छिंदवाडा शहर मध्यप्रदेश, सोमपेठा तेलंगणा, नगर तालुका, पुलगांव वर्धा, लाडखेड यवतमाळ, मानवत परभणी, नागबीड नागापूर ग्रामीण, डुगीपर गोंदीया, तासगाव सांगली, हिंगोली तालुका, अंबड जालना आदीं पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई रोहन खंडगळे, सफौ.सोन्याबापू नानेकर, पोना मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, योगेश सातपुते, मपोकॉ.सोनाली साठे, चालक पोहेकॉ. बबन बेरड आदींसह औरंगाबाद शहर स्थानिक गुन्हे शाखेचे क्राईम युनिट क्रं.1 चे पोनि.मधुकर सावंत, पोसई अमोल देशमुख, पोसई योगेश धांडे, विजय पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Post a Comment