अहमदनगर - शिंगणापूरमधील तरुणांचा प्रामाणिकपणा दिसून आला. १७ हजार रुपयांची रक्कम ब्राह्मणीतील मूळ मालकास परत केली. याबद्दल त्या तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे.
थोडक्यात माहिती अशी, ब्राह्मणीतील दर्शन कृषी सेवा केंद्राचे संचालक दादा खोसे सोमवारी आपली पुतणी ईश्वरी समवेत सोनई येथील शनेश्वर महाविद्यालयात इयत्ता अकरावीचा प्रवेश घेण्यासाठी गेले होते. दरम्यान दादा खोसे यांच्या खिशातील सतरा हजार रुपयांची रक्कम पडली. प्रवेश फी भरण्याच्या वेळी सदर बाब खोसे यांच्या लक्षात आली. कोणताही पुरावा नसताना हरवलेली रक्कम सापडणे आता शक्य नाही. असा विचार करून चर्चा न करता दादा खोसे यांनी एटीएम मधून डोनेशनसाठी रक्कम काढली. रक्कम भरताना सदर क्लार्क यांच्या कानावर रक्कम हरवल्याची माहिती दिली. यावेळी रक्कम सुखरूप असल्याची कल्पना संबंधिताने खोसे यांना दिली. सदर रक्कम शिंगणापूर येथील परशराम मुरलीधर बानकर, संदीप हरिभाऊ बानकर, रावसाहेब भिमराज दरंदले यांना सापडली होती. मात्र पॉकेटमध्ये नसलेली रक्कम नेमकी कुणाची असेल. अन, कुणाकडे द्यायची असा पेच त्यांना पडला. त्या तरुणांनी सदर रक्कम न मोजता आपल्याकडे ठेवून क्लार्क कडे एका कागदावर स्वतःचा मोबाईल क्रमांक लिहून दिला. सदर रक्कम शिंगणापूर येथील तरुणांकडे सुखरूप असल्याची माहिती मिळताच फोनवर रकमेचा अचूक आकडा सांगितल्याने सदर रक्कम ही दादा खोसे यांची असल्याची खात्री झाली. सदर रक्कम प्रामाणिकपणे दिल्याने दादा खोसे यांनी प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या त्या त्रिमूर्तींचा मंगळवारी दुपारी सोनईमध्ये सन्मान केला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सोपान नाना दरंदले, ग्रामीण पत्रकार संघाचे विनायक तात्या दरंदले, गणेश हापसे, शेखर मोकाटे बाळासाहेब हापसे, हर्षल मोटे, योगेश बानकर, सागर शिरसाठ, सुधीर दरंदले आदींच्या उपस्थित सदर रक्कम खोसे यांच्याकडे देण्यात आली.
Post a Comment