पैशाच्या वादातून गोळीबार ; डोक्याला कट्टा लावत दिली जीवे ठार मारण्याची धमकी




माय नगर वेब टीम
अहमदनगर - राहुरी तालुक्यातील उंबरे गावात एकाच्या डोक्याला गावठी कट्टा लावून हवेत गोळीबार केल्याची घटना सोमवारी (दि.८)घडली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत अशी की, शिवाजी मनोहर शिरसाठ, वय 41 वर्षे, धंदा शेती व त्यांचे मेहुणे दादासाहेब लक्ष्मण पाषाण हे दोघेजण पशुखाद्यासाठी उंबरे गाव शिवारात एस टी स्टँड जवळ
शहाराम आडसुरे यांचे गणेश कृषी सेवा केंद्र समोर गेले असता नारायण काळे व मेव्हणा पाषाण यांच्यात जुन्या पैशावरून शाब्दिक वाद झाले. वाद घालू नका काय असेल ते व्यवहार मिटवून घ्या, आम्ही पैसे द्यायला आलो आहोत असे सांगत असतानाच त्याचा राग येऊन सुजित काळे याने पशुखाद्याच्या दुकानातून येऊन त्याच्या हातातील गावठी कचाट्यातून हवेत गोळीबार केले. गावठी कट्टा फिर्यादीच्या डोक्याला लावून जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पाषाण याने  धक्का देऊन काळे यास ढकलत जीवे ठार मारण्यातचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 सुजित नारायण काळे व  नारायण रघुनाथ काळे, दोघे रा . उंबरे , ता . राहुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि गाडे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post