ज्युनिअर एशियन चॅम्पियनशीप कुस्तीस्पर्धेसाठी नगरची भाग्यश्री फंड कझाकिस्तानला रवाना
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शांतीकुमारजी मेमोरिअल फाऊंडेशनने पालकत्व स्विकारलेल्या व अहमदनगर जिल्ह्याचे नांव परदेशात गाजविणारी सुवर्णकन्या भाग्यश्री हनुमंत फंड ही नुकतीच ज्युनिअर एशियन चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी कझाकिस्तानला रवाना झाली. तीला स्पर्धेसाठी फाऊंडेशनच्या वतीने नरेंद्र फिरोदिया यांनी शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्री फंड ही ज्युनिअर गटातील 61 किलो वजन गटात कझाकिस्तानला भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्या खेळाकडे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागून आहे. भारतीय संघात स्थान पटकाविणारी महाराष्ट्रातील भाग्यश्री ही एकमेव महिला कुस्तीपटू ठरली असून, आपल्या खेळाच्या जोरावर परदेशात आपल्या जिल्ह्याचे नांव ती उंचावणार आहे. अशा गुणी खेळाडूंच्या पाठीशी शांतीकुमारजी मेमोरिअल फाऊंडेशनन सदैव उभे राहणार असल्याची भावना नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment