अबब ...! जिल्हा परिषदच्या मुख्यालयातील पाणी दूषित?


माय नगर वेब टीम

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते. मात्र हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. संपूर्ण जिल्ह्याचा कारभार ज्या जिल्हा परिषदेतून चालवला जातो. तेथील कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना हेच पाणी प्यावे लागते. हे दुषित पाणी पिल्यामुळे जलजन्य आजाराचा धोका असतो. त्यामुळे जिल्ह्याचा कारभार हाकणाऱ्या मिनी मंत्रालयातच नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे.

ज्या मिनी मंत्रालयातून जिल्ह्याच्या कारभाराचा गाडा हाकला जातो. त्या मिनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसह येणाऱ्या असंख्य नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असेल तर यापेक्षा गंभीर बाब कोणती. नुकतीच जिल्हा परिषदेतील पिण्याच्या पाण्याचे प्रयोगशाळेत नमुने पाठवले होते. यात हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आल्याने हा प्रकार समोर आला आहे. नुकतेच जिल्ह्यातील ९० गावांमध्ये सध्यस्थितीत दूषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याचा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यांच्या मासिक अहवालातून ही आकडेवारी उघड झाली आहे. दूषित पाणी पिल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होत असतो. ग्रामीण भागातील अशी अवस्था असताना मुख्यालयातील देखील पाणी पिण्यास अयोग्य असल्याच्या अहवालाने मात्र सर्वांचेच लक्ष आता पाण्याकडे लागले आहे.

याबाबत जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी व पाणी पुरवठा कक्षासमोरील पिण्याच्या पाण्याचे नमूने पाठवले होते. त्याचा अहवाल अयोग्य आला होता. नंतर प्रशासकीय इमारतीतील सर्व पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील योग्य व इतर सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. या पाण्याचा वापर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसह येथे येणारे नागरिक पिण्यासाठी करतात. परंतु हे दुषित पाणी पिल्यास जलजन्य आजार होवू शकतात. त्यामुळे या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरिन प्रक्रिया केल्यानंतर व सुक्ष्मजीव पुनर्तपासनीनंतर हे पाणी पिण्यास वापरता येवू शकते असा अभिप्राय प्रयोगशाळेने दिला आहे.




जिल्हा परिषदेतील पाण्याचे नमूने प्रयोगशाळेने तपासून हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल दिला आहे. याबाबत बांधकाम विभागास पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून,पाण्यावर योग्य ती प्रक्रीया करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सांगळे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post