विखे पाटलांनी दिला आमदारकीचा राजीनामा




माय नगर वेब टीम

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीअगोदर त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता.



सुजय यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती. त्यानंतर सुजय अहमदनगर मतदारसंघातून निवडून देखील आले. सुजय यांच्यानंतर त्यांचे वडील देखील भाजपच्या मार्गावर आहेत, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. येत्या दोन दिवसांत ते भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली असून आज त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह १० ते १२ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी ‘टिव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post