
माय नगर वेब टीम
मुंबई - विधानसभा निवडणुकीला अवघे ३ महिने बाकी आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेनी एकत्र निवडणूक लढवत प्रचंड यश मिळवले होते. परंतु आता भाजपने विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करत राज्यात सर्व २८८ विधानसभा जागांवर लढण्याची तयारी ठेवा असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “युती होईल, पण त्यात मुख्यमंत्री कोणाचा हे समजूतदार माणसाला कळते. अननुभवी, बालिश लोकांना त्याची चर्चा करू द्या, जिंकण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन यांनी करत युती झाली, तरी मुख्यमंत्रिपद भाजपकडे राहील”, असे स्पष्ट केले.
पुढे बोलताना त्यांनी “राज्यात शिवसेनेशी युती होईल, पण कोणाला कोणत्या जागा सुटतील, हे ठरलेले नाही. तुम्ही मात्र, सर्व २८८ जागा लढण्याची तयारी ठेवा”, असे उद्गार त्यांनी काढले. तसेच मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, या चर्चेत तुम्ही पडू नका, ते आम्ही बघू, असे मुख्यमंत्री म्हणाले. लोकसभेला ७०-८० टक्के मते युतीला मिळाली, तेथील पक्षाच्या आमदारांनी गाफील न राहता परिश्रम घ्यावेत, असेही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती होती. परंतु विधानसभा निवडणुकीत दोनही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती त्यामुळे यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Post a Comment