अबब ! कंडोम' घोटाळ्याचा पर्दाफाश, 11 कंपन्या रडारवर



माय नगर वेब टीम


नवी दिल्ली : देशात भ्रष्टाचाराची आजवर अनेक प्रकरणं उघडकीस आली. चारा घोटाळ्यापासून कोळश्यापर्यंत आणि चिक्कीपासून ते स्पेक्ट्रमपर्यंत असे अनेक घोटाळे देशात आणि राज्यात गाजले होते. मात्र आता एक नवाच घोटाळा उघडकीस आलाय. हा घोटाळा आहे 'कंडोम'चा. देशातल्या 'कंडोम' तयार करणाऱ्या 11 कंपन्यांनी सरकारला कोट्यवधी रुपयांस फसविण्यात आल्याचे उघड झाले आहे या कंपन्यांवर सरकार कडून कारवाई होण्याची शक्यता आहे.


C.I.I.ने केलेल्या चौकशीत हा घोटाळा उघड झाला. केंद्रीय आरोग्य आणि समाजकल्याण मंत्रालय देशातल्या विविध सामाजिक संघटनांना नि:शुल्क 'कंडोम'चं वाटप करत असतं. लोकसंख्या नियंत्रण, एड्स निर्मुलन, गुप्तरोगांना आळा घालणं, वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांना सरकार 'कंडोम'चा दरवर्षी पुरवठा करत असते. यासाठी विविध कंपन्यांकडून 'कंडोम'ची खरेदी केली जाते.2012 ते 2014 या काळात देशातल्या 11 कंपन्यांनी मिळून सरकारला महागड्या दरात 'कंडोम्स'ची विक्री केल्याचं आढळून आलंय. या कंपन्यांनी संगनमताने जास्त दराची निविदा दिली आणि इतर कंपन्यांनी त्याला आव्हान दिलं नाही. त्यातून त्यांनी मलिदा वाटून घेतला असा आरोप आहे. यात सरकारच्या दोन कंपन्यांचाही समावेश आहे. यापुढच्या चौकशीत या कंपन्या दोषी आढळल्यात तर त्यांना त्यांच्या नफ्यातला हिस्सा किंवा प्रचंड मोठी दंडाची रक्कम द्यावी लागणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post