कलेक्शन करणाऱ्याला चोरट्यांनी लावला अडीच लाखाला चुना
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शहरात व उपनगरात कलेक्शन करणाऱ्याच्या दुचाकीत ठेवलेली 2 लाख 40 हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली. केडगाव परिसरातील अंबिका हॉटेल समोर आज बुधवारी(दि.12) सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी अंकुश भगवान गायखे यांनी फिर्याद दिली आहे.
गायखे हे पतसंस्था व किराणा दुकानाचे कलेक्शन करण्याचे काम करतात. आज सकाळी ते अंबिका हॉटेल परिसरात कलेक्शनसाठी आले होते. कलेक्शन दरम्यान जमा झालेली 2 लाख 40 हजाराची रक्कम त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. गायखे यांचे लक्ष विचलित करून चोरट्यांनी दुचाकीची डिकी फोडत त्यातील रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment