वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा


माय नगर वेब टीम

पुणे – वैद्यकीय व दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत आले असून राज्य सरकारने विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करण्यासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा. अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशमंत्री स्वप्नील बेगडे यांनी केली.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या परीक्षा प्रक्रियेला मराठा आरक्षणाचा कायदा लागू न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. परिणामी, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेतलेल्या 213 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांच्या पाठिशी “अभाविप’ आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post