महाराष्ट्रात पाऊस लांबण्याची शक्यता ?





माय नगर वेब टीम

मुंबई - यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशीर दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटकडून देण्यात आली आहे. 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून लांबणार असल्याचचे सांगण्यात येत आहे.

यंदा 93 टक्की पाऊस पडणार असल्याचंही स्कायमेटने म्हटले आहे. 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर 4 जूनपर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी माहिती स्कायमेटचे शास्त्र्रज्ञ सुशांत पुराणिक यांनी दिली आहे.

सुशांत पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होणार असा अंदाज होता, पण तो आता लांबणीवर जाणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. पण यंदा महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती बिकट राहिल अशी माहितीही त्यांनी दिली.

मान्सून हूल देणार की वेळेत येणार ?

काही दिवसांपूर्वी स्कायमेटच्या अंदाजानुसार देशात मान्सून सरासरीच्या 93 टक्के पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. भारतातील मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव असेल असाही अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. मात्र, हवामान विभागाने देशात यंदा चांगला मान्सून होणार असल्याचं म्हटलं होतं. मान्सूनवर अल निनो वादळाचा प्रभाव कमी असू शकतो असंही सांगण्यात आले होते.

हवामान विभागाच्या आतापर्यंतच्या अंदाजानुसार, 'अल निनोचा प्रभाव कमी असेल त्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या मौसमात दिलासा मिळू शकतो.' यंदा सरासरीच्या 95 ते 104 टक्के सामान्यत: मान्सून येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post