नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या ७ व्या टप्प्यात १९ मे रोजी होणारे मतदान सकाळी सातऐवजी पहाटे ५.३० वाजता सुरू करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. रमजानचा उपवास ठेवणाऱ्या मुस्लिमांना उन्हामुळे होणारा त्रास वाचवण्यासाठी ही मागणी करण्यात आली होती. यापूर्वी निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली होती. न्या. इंदिरा बॅनर्जी आणि संजीव खन्ना यांच्या सुटीतील पीठाने म्हटले की, अशा मागणीवर निर्णय घेण्याचा विशेषाधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. आयोगाने जो निर्णय दिला तो योग्य आहे. पीठाने म्हटले की, मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. सकाळच्या वेळी लोक मतदान करू शकतात. वेळ बदलून पहाटे केली तर निवडणूक आयोगाला बंदाेबस्तासाठी अनेक अडचणी येऊ शकतात. आयोगाने ५ मे रोजी ही मागणी फेटाळली. मोहंमद निझाम पाशा यांनी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
पहाटे ५.३० वाजता मतदान सुरू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Post a Comment