माय नगर वेब टीम
अभिनेत्री आणि निर्माती दिया मिर्झाला संयुक्त राष्ट्राने सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऍडव्होकेट म्हणून घोषित केले आहे. अभिनेता फॉरेस्ट व्हिटकर, बेल्जियमच्या महाराणी मिथिल्डे आणि नॉर्वेतील पंतप्रधान एर्ना सोल्बर्ग यांनी मिळून दिल्याला “सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’साठी ऍडव्होकेट म्हणून नियुक्त केले आहे. पर्यावरणाबाबतच्या आपल्या कर्तव्यांबाबत दिया नेहमीच सतर्क राहिलेली आहे. एकोफ्रेन्डली लाईफ स्टाईल स्वीकारण्यासाठी ती लोकांमध्ये जागरुकताही निर्माण करत असते.
2017 मध्ये दिया मिर्झाला संयुक्त राष्ट्राची गुड वील ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर दियाने निसर्ग संवर्धनाचे आपले कर्तव्य अधिकच गांभीर्याने घेतले आणि खास अभियान राबवून तिने लोकांपर्यंत निसर्ग संवर्धनाचा संदेश पोहोचवला.

Post a Comment