घड्याळाचं बटण दाबलं, मत मात्र कमळाला ; पवारांचा दावा




सातारा - EVMचा मी स्वत: अनुभव घेतला आहे. त्या बाबत मला ईव्हीएमची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही जणांनी मशीन ठेवली आणि मला बटण दाबायला सांगितले. मी घड्याळाचे बटन दाबले होते. मात्र मी दिलेले मत हे कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

सगळ्याच EVM मशीनमध्ये असे असेल असे मी म्हणत नाही. मात्र, मी हे पाहिलेले आहे, म्हणून मी काळजी व्यक्त केली, असे पवार म्हणाले. यासाठी आम्ही कोर्टात गेलो, मात्र दुर्दैवानं कोर्टाने आमचे म्हणण ऐकले नाही. आम्ही ५० व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या. त्या चिठ्ठ्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या देखील होत्या, असे पवार यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post