मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश भागात १९७२ च्या दुष्काळापेक्षाही भीषण स्थिती आहे. शरद पवारांनी ३० एप्रिल, १२ व १३ मे या दिवशी सोलापूर, अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावांना, पाण्याअभावी सुकलेल्या फळबागांना व चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.
दरम्यान, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळावर कायमस्वरूपी ठोस तोडगा काढण्यासाठी ग्रामस्थांची कैफियत व समस्या विस्तृत पत्रात मांडल्या आहेत.

Post a Comment