घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या बारस्करला जेलची हवा


माय नगर वेब टीम

अहमदनगर

उपनगरातील तपोवन रोडवरील एका वसाहतीत राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून एका युवकाने पाणी पिण्याचा बहाणा करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी फिर्यादीनंतर तोफखाना पोलीस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून सावेडी गावातील तलाठी कार्यालयाजवळ राहणार दिलीप उर्फ सागर बारस्कर याला अटक करून मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर माहिती अशी, तपोवन रोडवरील ढवणवस्ती येथील एका घरात आरोपी दूध घालण्याचे काम करीत होता. सदर पीडित महिला घरात एकटी असल्याचे पाहून सदर आरोपी पाणी मागण्याचे कारण करून महिलेच्या कंपाउंड भितीवरून उडी मारून घरात घुसला. महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी अश्लील बोलून तिच्याशी गैरवर्तन केले . महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपी तेथून पळून केला सदर महिलेचा पती घरी आल्यनंतर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली फिर्यादीत बारस्कर ( पूर्ण नाव नाही ) मी एकटी असल्याचे पाहून आरोपी दूध देऊन परत आला त्याने पाणी मागणी करून त्याने भितीवरून उडी मारून किचनमध्ये येऊन त्याने गैरवर्तन केलं असे म्हंटले आहे. हि घटना २० रोजी घडली होती. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी दिली आहे. तपास हे कॉ. शिरसाठ यांनी केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post