आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी?



माय नगर वेब टीम
मुंबई : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच भाजप आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. फडणवीस सरकार लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या विचारात आहे. तशा हालचाली राज्य सरकारने चालविल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीआधी फडणवीस सरकार हे मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्या-जिल्ह्यातून मागवण्यात आली आहे. मार्च 2016-17 ते 2018 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन त्यांना मोठा दिलासा देण्याचे सरकारचे प्रयत्न असणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभरात विकास यात्रा काढून जनतेशी संवादही साधणार आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील 43 लाख 35 हजार शेतकऱ्यांना 18 हजार 235 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post