माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - जगभरात हाहाकार माजवणारा आणि करोडो लोकांचा बळी घेणारा कोरोना..... जगभरात लागलेलं लॉकडाऊन, ऑक्सिजनसाठी तडफडणारे रुग्ण अन् स्मशानात पेटलेल्या चिता.. आज 6 वर्षांनंतर आठवूनही अंगावर काटा येतोय ना? पण आता जग पुन्हा अशाच धोक्याच्या उबरठ्यावरये. कारण चीनच्या वुहान प्रयोगशाळेसारखाच एक भयंकर प्रकार आता रशियात घडलंय, होय... रशियातील एका हाय-सिक्युरिटी रिसर्च लॅबमधून किलर व्हायरस लीक झालाय, ज्यामुळे अख्ख्या जगावर पुन्हा एकदा महासंकट पसरण्य़ाची भीती आहे.
सिबेरियातील शेलेखोव अँटी-प्लेग इन्स्टिट्यूटमध्ये घातक संसर्ग लीक, एका रिसर्चर महिलेचा मृत्यू
निमोनिक प्लेगचा मानवी फुफ्फुसांवर हल्ला, रुग्णाच्या श्वासानं आजाराचा हवेत प्रसार
200 लोकांना तातडीनं क्वारंटाईन करत रुग्णालय सील, परिसरात मास्क सक्ती, शहरात हाय अलर्ट
लीक झालेल्या जैविक पदार्थाची रशियाची मुख्य संसर्ग एजन्सीकडून तपास
योग्य अँटीबायोटिक्स वेळेत मिळाल्यास आजार बरा होण्याची WHOची माहिती
सिबेरियातील शेलेखोव अँटी-प्लेग इन्स्टिट्यूटमध्ये घातक संसर्ग लीक, झाल्यानं एका 28 वर्षीय रिसर्चर महिलेचा मृत्यू झालाय. मानवी फुफ्फुसांवर वेगानं हल्ला करणारा हा आजार निमोनिक प्लेगचा प्रकार असून रुग्णाच्या श्वासातील तुषारांद्वारे या आजाराचा हवेत वेगानं प्रसार होतो. ही घटना निदर्शनास आल्यानंतर 200 लोकांना तातडीनं क्वारंटाईन करण्यात आलं असून रुग्णालय सील झालंय तर परिसरातील एल्युमिनियम प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना मास्क सक्ती करत शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. घडल्या घटनेची गुप्त चौकशी ही रशियाची मुख्य संसर्ग एजन्सीकडून सुरु झालीये. याचवेळी WHOनं वेळेत योग्य अँटीबायोटिक्स मिळाल्यास आजार बरा होणे शक्य असल्याचं म्हणत दिलासा दिलाय.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न... हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचणार का? तर रशियात पसरलेला हा आजार प्लेग किंवा बॅक्टेरियल निमोनिया असू शकतो, ज्यावर योग्य वेळेत अँटीबायोटिक्स औषधे दिली तर रुग्ण पूर्णपणे बरा होतो. हा कोरोनासारखा संपूर्ण जगाला विळखा घालणारा विषाणू आहे, हे अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे सध्या तरी घाबरून जाण्याचं कारण नाही.

Post a Comment