पुन्हा हवामानात बदल! सलग ६ दिवस मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा



माय नगर वेब टीम 

मुंबई : देशभरातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. तसेच दक्षिण-पश्चिम अरब समुद्रात तयार झालेली यंत्रणा आणखी मजबूत होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस देशातील विविध भागांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० ते २३ ऑक्टोबर या दरम्यान मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. २१ ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आगामी २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान देशातील उत्तर भागात पावसाची शक्यता आहे. यामध्ये दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदीगड परिसरामध्ये २४ ते २५ ऑक्टोबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जम्मू-कश्मीर, लद्दाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान, तर उत्तराखंडमध्ये २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान पाऊस पडू शकतो.

दक्षिण आणि इतर राज्यांतही मुसळधार

दक्षिण भारतात केरळ, माहे आणि लक्षद्वीप परिसरात २६ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, विदर्भ आणि छत्तीसगडमध्येही काही ठिकाणी गरज आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये २३ ते २५ ऑक्टोबर दरम्यान, हिमाचल प्रदेशात २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान आणि उत्तराखंडमध्ये २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पंजाबमध्येही २४ ते २५ ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये २४ ऑक्टोबर रोजी आणि पूर्व राजस्थानमध्ये २० व २४ ऑक्टोबर रोजी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थानमध्ये २४ ऑक्टोबर रोजी आणि पूर्व राजस्थानमध्ये २० ऑक्टोबर रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता असून, तो ताशी ५० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post