मतदार संघाच्या बदलाचे अक्षय कर्डिले बनणार 'शिल्पकार'!


 मतदार संघाच्या बदलाचे अक्षय कर्डिले बनणार 'शिल्पकार' !

आ. संग्राम जगताप यांचा विश्वास ; कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार 

माय नगर वेब टीम 

नगर तालुका : राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या विकासाला अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून वेग येणार आहे. विकासाची नवी दिशा ठरवून अक्षय कर्डिले मतदारसंघाच्या बदलाचे निश्चितपणे शिल्पकार ठरणार असल्याचा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला.



     आ. संग्राम जगताप यांनी जेऊर येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना आ. जगताप यांनी अक्षय कर्डिले यांच्या युवा नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत अक्षय याचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. मतदार संघाला विकासाची नवी दिशा अक्षयच्या माध्यमातून मिळणार आहे. मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अक्षय कर्डिले यांचे नेतृत्व सक्षम असून त्यांच्या माध्यमातून प्रलंबित तसेच नवीन विकास कामांना गती मिळेल.

      रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच शेती संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी समन्वय आणि काम करण्याची गरज आहे. अक्षय कर्डिले हे अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व असून त्यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. अक्षय कर्डिले यांना समाजसेवेचे व जनतेच्या प्रश्नांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे बालकडू घरातूनच स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून मिळालेले आहे.



       कार्यकर्ते पक्षाचे खरे बळ असून त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच पक्ष संघटना मजबूत होत असते. त्यामुळे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे ही आपली जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

       मतदारसंघातील विकास कामांना ही प्राधान्य दिले जाईल. कार्यकर्त्यांच्या सहकार्यांने विविध योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल असा विश्वासही आ.जगताप यांनी व्यक्त केला. जेऊर पंचक्रोशीतील नागरिकांनी जेऊर गटातून अक्षय कर्डिले यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य देण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार संग्राम जगताप यांना दिली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

युवा नेते सुनील पवार यांच्यावर स्व. शिवाजीराव कर्डिले यांचा अत्यंत विश्वास होता. सुनील पवार स्व. कर्डिले यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. शेवटपर्यंत त्यांनी स्व. कर्डिले यांना साथ दिली. आता त्यांच्यावर अक्षयची मोठी जबाबदारी आहे. सुनील पवार यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. कार्यकर्त्यांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. स्वर्गीय कर्डिले यांच्या प्रमाणेच  सुनील पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकद उभी करु. कोणत्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

आ. संग्राम जगताप

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post