नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा निवडणुकांचे बिगूल वाजले असून आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आह. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय.
निवडणूक आयोगाचे अध्यक्ष गौतम कुमार यांनी माहिती दिली की, आसाम, केरळ, पुदुच्चेरी येथे ९ एप्रिल रोजी मतदान होईल. तर, तामिळनाडू येथे २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडले. तसंच, पश्चिम बंगाल दोन टप्प्यात मतदान प्रक्रिय पार पडणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया २९ एप्रिल रोजी होईल. या सर्व राज्यांची मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि निवडणूक आयुक्त विवेक जोशी यांचा समावेश असलेल्या निवडणूक आयोगाने दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली. या निवडणुकीत ८२४ मतदारसंघांमधील २.१८ लाख मतदान केंद्रांवर १७.४ कोटी मतदार सहभागी होतील, असे सीईसीने सांगितले.
केरळ, आसाम, पुदुच्चेरी या राज्यातील निवडणूक कार्यक्रम कसा असेल?
१६ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रमाचे जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. २३ मार्चपर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करू शकतात. २४ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. २६ मार्चपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. ९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. तर, ४ मे रोजी मतमोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
तामिळनाडू येथील निवडणूक कार्यक्रम कसा असेल?
३० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून ३ एप्रिलपर्यंत उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. ७ एप्रिल रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाईल. तर, ९ एप्रिल रोजी उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. तसंच, २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल, तर ४ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान
२०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान प्रक्रिया झाली होती. मात्र, यावेळी दोनच टप्प्यांत मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानुसार, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी ३० मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून ६ एप्रिलपर्यंत उमेदवार उमेदवारी अर्ज भरू शकतात. तर, ७ एप्रिल रोजी उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली जाईल. ९ एप्रिल रोजी उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. तसंच, २३ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर, ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २ एप्रिल रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असून ९ एप्रिलपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात. १० एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून १३ एप्रिल रोजी उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. तर, २९ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर, ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Post a Comment