माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – अहिल्यानगर शहर व श्रीरामपुर येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत एकूण 1 लाख 81 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक दिपक मेढे, पोलीस अंमलदार सुनिल पवार, शाहिद शेख, सतिष भवर व आकाश काळे यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने 24 सप्टेंबर रोजी शहर व श्रीरामपुर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकून कारवाई केली.
कारवाईचा तपशील
-
श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 880/2025
भारतीय न्याय संहिता कलम 271, 223 व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5(क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल.
आरोपी – जुबेर आयुब कुरेशी, वसीम इसाक कुरेशी (दोन्ही रा. वार्ड नं. 2, श्रीरामपुर) व मुस्ताक कुरेशी (पूर्ण पत्ता उपलब्ध नाही).
जप्त मुद्देमाल – 800 किलो गोमांस, लोखंडी सुरा, किंमत 1,60,300 रुपये. -
तोफखाना पोलीस ठाणे गु.र.नं. 966/2025
भारतीय न्याय संहिता कलम 271, 223 व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5(ब)(क), 9 प्रमाणे गुन्हा दाखल.
आरोपी – फेरोज शमशेर शेख (रा. घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर).
जप्त मुद्देमाल – 100 किलो गोमांस, लोखंडी वजनी काटा, कोयता, किंमत 21,200 रुपये.
एकूण आकडेवारी
- गुन्हे दाखल : 2
- आरोपी : 4
- जप्त मुद्देमाल : 1,81,500 रुपये किंमतीचा
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
Post a Comment