उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विषयावर आजिनाथ शिंदे यांनी सुंदर भाषण केले
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अहिल्यानगरचे आजिनाथ रामदास शिंदे यांनी 51 हजार रुपये प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी *मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने संभाजीनगर मध्ये श्रीनाथ अभिष्टचिंतन सोहळा सेवा सप्ताह आयोजित केला होता*.
सर्वसामान्य जनतेतील असामान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या विषयावर आजिनाथ शिंदे यांनी भाषण केले. राज्यभरातून 140 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. वयोगट 21 ते 45 वयातील व्यक्तींना या स्पर्धेत सहभाग घेता येत होता. अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आजिनाथ शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले. त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल जिल्हाभरातून त्यांचा अभिनंदन होत आहे. संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा म्हाडा असोसिएशनचे अध्यक्ष माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
Post a Comment