नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन; चष्मे वाटपही होणार



खा. नीलेश लंके यांचा पुढाकार; खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य, गावोगावी होणार शिबिरे 

माय नगर वेब टीम 

पारनेर : खा. नीलेश लंके व राणी लंके यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू व चष्मा वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे तसेच नीलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम पवार यांनी सांगितले. 

      शरद पवार यांच्या दि. १२ डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या वाढदिवशी या शिबिराचे उदघाटन होणार असून दि.५ जानेवारी २०२५ पर्यंत विविध गावांमध्ये ही शिबिरे घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुवर्णा धाडगे, युवतीच्या तालुकाध्यक्ष पुनम मुंगसे यांनी सांगितले. 

      अलिकडेच नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने एक सुसज्ज रूग्णवाहिका जनतेच्या सेवेत रूजू करण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेमध्ये नेत्र तपासणीसंदर्भातील अद्यावत उपकरणे असून तज्ञ डॉक्टर रूग्णांची तपासणी करून गरजूंना चष्म्याचेही वितरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष लकी कळमकर यांनी सांगितले.

   विधानसभा निवडणूकीपूव राणी लंके यांच्या संकल्पनेतून आरोग्य यज्ञाचे आयोजन करण्यात येउन महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी करण्यात आली होती. या शिबिराचा हजारो महिलांनी लाभ घेतला होता. ब्रेस्ट कॅन्सर तपासणी बरोबरच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरालाही गावोगावी मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता नेत्र तपासणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठान पुन्हा एकदा सामाजिक दायित्व पार पाडणार आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कारभारी पोटघन, बाळासाहेब खिलारी यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post