माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर झाली आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वंचितची तिसरी यादी आत्ताच जाहीर केली. त्यामध्ये श्रीगोंदे मतदारसंघातून शेलार यांचे उमेदवारी नाव आहे.
दरम्यान अण्णासाहेब शेलार हे श्रीगोंदा मतदार मतदारसंघात गेल्या 40 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी महिनाभरापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही ,तसेच माघारही घ्यायची नाही,प्रसंगी अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवून लढाई करायचीच असा निर्धार व्यक्त केला होता.त्यासाठी त्यांनी तयारी सुद्धा सुरू केली होती.त्यांच्या उमेदवारी मूळे श्रीगोंदा मतदार संघात बहुरंगी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.
Post a Comment