*साकुरी येथे बुद्धविहार इमारत बांधकामाचे भूमिपूजन*
माय नगर वेब टीम
शिर्डी :- राहाता तालुक्यातील सर्व गावांमध्ये सामाजिक सभागृहांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील साकुरी येथील बुद्धविहार इमारत बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे , उप विभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, साकुरीचे सरपंच मेघना दंडवते आदी उपस्थित होते.
श्री.विखे पाटील म्हणाले, साकुरी गावातील सर्व समाज मंदीर व सभागृहासाठी शासनाने ५० कोटी रूपये किंमतीच्या जमीनी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
यावेळी बोलतांना क्रीडा श्री.बनसोडे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा हा मंत्र समाजाला दिला आहे. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करण्याचे काम शासन करत आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसस्पर्श लाभलेल्या ठिकाणांवर आंतरराष्ट्रीय स्मारके करण्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक विकास कार्यक्रम २०२४-२५ च्या निधीतून साकुरी बुद्धविहाराच्या बांधकामाला निधी उपलब्ध झाला आहे.
Post a Comment