माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील दरेवाडी येथे नारायण डोह रस्त्यावर एका शेत जमिनीच्या लोखंडी जाळीचे कंपाऊंड काढण्याच्या करणातून २ गटात वाद होवून हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०)सकाळी १०.३० ते ११ या कालावधीत घडली. या प्रकरणी या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी वरून दोन्ही गटाच्या १२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली फिर्याद मच्छिंद्र भानुदास बेरड (वय ४२, रा.दरेवाडी) यांनी दिली असून या फिर्यादी वरून संतोष लहानू सूर्यवंशी, हरिभाऊ खर्से (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), पवन रामप्रसाद धूत (रा. सारसनगर), जगदीश रामविलास करवा (रा. फलटण, जि. सातारा), सिध्दार्थ बाळासाहेब भिंगारदिवे (रा. दरेवाडी), संतोष सुर्यवंशी याची दोन मुले (नाव माहित नाही, रा. सारसनगर) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेरड हे शेत जमिनीत काम करत असताना आरोपींनी शेतीचे लोखंडी जाळीचे कंम्पाऊंड तोडून नुकसान केले. त्याचा जाब विचारल्यावर बेरड यांना शिवीगाळ, लाथाबुक्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. बेरड यांची दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. पठारे करत आहेत.
तर दुसरी फिर्याद हरिभाऊ जिजाबा खर्से (वय ४३, रा. बुऱ्हाणनगर, ता.नगर) यांनी दिली असून त्यानुसार मच्छिंद्र भानुदास बेरड, दीपमाला मच्छिंद्र बेरड, रंभा भानुदास बेरड, साईनाथ विठ्ठल साळुंखे, आशा निंबाळकर (सर्व रा. दरेवाडी, ता.नगर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे शेतात कंपाऊंडचे काम करत असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही माझ्या शेतातील तारेचे कंपाऊंड का पाडले असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. पुढील तपास महिला पो.हे.कॉ. जयश्री फुंदे या करत आहेत.
Post a Comment