अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी अध्ययनाची शोधगंगा .........पुष्पा लांडे


अहमदनगर: शिक्षण हे समाज परिवर्तनाने साधन आहे. कोणत्याही देशानी प्रगती ही शिक्षणावरन अवलंबून असते. अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच शिक्षण ही जीवनावश्यक बाब बनली आहे. ज्या देशांनी आज विज्ञान, तंत्रज्ञान व अंतराळात उल्लेखनीय प्रगती केली त्या देशातील शिक्षण पध्दती अतिशय प्रभावी असून ते देश प्राथमिक शिक्षणावर विशेष भर देत असलेले दिसून येत आहेत.

     ६ एप्रिल, १९६३ रोजी शिकागो येथे भरलेल्या सभेत पालकांशी बोलताना डॉ. सॅम्युअल कर्क यानी 'अध्ययन अक्षमता' हे शब्द मुलांना उद्देशून प्रथम वापरले.

(हालाईन व क्विक शंक, १९७३) यांनी अध्ययन अक्षम मुलांसाठी व प्रौढांसाठी काम करण्यासाठी असोसिएशन फॉर चिल्ड्रन विथ लर्निंग डिसबिलीटीज' ही संस्था स्थापन केली. अध्ययन अक्षमता निर्माण होते ती मज्जासंस्थेतील विधाडामुळे असे १९६७ मध्ये जॉन्सन आणि मायकलवस्ट यांनी सुचविले आणि या स्थितीला त्यांनी मानस मज्जासंस्थीय अध्ययन-अक्षमता असा शब्दप्रयोग वापरला. अमेरीकेत नॅशनल ॲडव्हायझरी कमिटी ऑन हॅन्डिकॅप्ड चिल्ड्रन्स ने १९६९ मध्ये एक कायदा संमत केला. यामध्ये त्यांनी असे म्हटले की, विशेष शैक्षणिक गरज असलेल्या मुलांना बोली व लिखित भाषाच्या आकलनासाठी, वापरासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत प्रक्रियांमध्ये अडचणी असतात. मुलांच्या विचार करण्याच्या पध्दती, ऐकण्याच्या, बोलण्याच्या, वाचन, लेखनाच्या किंवा गणित करण्याच्या पध्दतीमधून या अडवणी दिसून येतात. यामध्ये संवेदनात्मक अपंगत्व,मेंदूची इजा, भाषिक अक्षमता, वायादोषांमुळे बोलीभाषा शिकताना येणाऱ्या अडचणीचा समावेश होतो.

       १९९७ मध्ये द नॅशनल जॉइंट कमिटी फॉर लर्निंग डिसबिलीटी (NJCLD,USA) ने ऐकण्याच्या, बोलण्याच्या, विचार व गणिती क्षमतांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी ज्या अनेकविध लक्षणांद्वारे दिसून येतात त्यांना उद्देशून अध्ययन अक्षमता ही संज्ञा वापरली.

       अलीकडच्या काळात अमेरीकन सोशल एज्युकेशन लॉ द इंडिव्हिज्युअल्स विभ डिसेंविलिटीज एज्युकेशन ॲक्ट (आयडीईट, २००२) या कायद्यान्वये अध्ययन अधमता म्हणजे बोली, लिखित, आकलन व गणिती क्रिया या मुलभूत प्रक्रियेमध्ये अडथळा व अडचणी निर्माण होणे होय असे सांगितले. (३४ कोड ऑफ फेडरल रेग्युलेशन्स सेक्शन ३००.७)

      अध्ययन अक्षमतेबाबत पालकांच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात काम करणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा विशेषत्वाने विचार आणि अभ्यास होऊ लागला आहे वाचन, लेखन किंवा गणित अपेक्षेप्रमाणे करता न आल्याने शिक्षणात मागे पडणारी, शिक्षकांच्या नजरेतून उतरलेली म्हणून पालकांपासूनही दुरावलेली व आत्मसन्मान गमावून बसलेली मुलं, लहान वयातच असताना आपलं बालपण हरवून बसण्याचे कारण अध्ययन अधमता असू नये असे वाटते. उपचारात्मक कृती कार्यक्रमाची यशस्वी अमलबजावणी पाहता अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन नक्की बदलेल.

     मानसशास्त्रीय सिद्धांतामध्ये अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास करण्याच्या दृष्टिने शैक्षणिक कार्यक्रम तयार करून डॉलर्स कमिशन फॉर पिलर्स ऑफ एज्युकेशन या शैक्षणिक उपपत्तीवर आधारित लर्निंग टू इ या उपपत्तीवर भर देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेने शिकणे अभिप्रेत आहे.

________________

 शब्दांकन .....पुष्पा शिवराम लांडे 

(एम.ए.एम.एड...एम फिल,...सेट,नेट )

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 

शिळवंडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post