शिक्षण: परिवर्तनाचे साधन ....पुप्षा लांडे


अहमदनगर: मानवाचे राहणीमान उंचावणाऱ्या या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पंखांनी मानवाचे समृध्दीच्या नभात गरुडहीप केवळ शिक्षण या घटकांमुळे शक्य झाली आहे. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण ही सुध्दा मुलभूत गरज बनली आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी सर्वाती परी सर्व स्तरांतून प्रयत्न होत आहेत

शिक्षण या संकल्पनेकडे समाज परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते. शिक्षणामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये अमूलाग्र बदल घडून आलेला दिसतो. पूर्वीच्या काळी शिक्षण ही प्रकिया लेखन बाबन या क्षमतापुरतीच मर्यादित होती मात्र ही संकल्पना आज विस्तारत आहे. शिक्षणामुळे आज मानवाला अशक्यप्राय वाटणाल्या अनेक गोष्टी सहज सुलभ होत आहेत. मानवाला गरुडपंख देणाऱ्या या शिक्षणामुळे सामाजातील प्रत्येक घटक कियाशील होणे अपेक्षित आहे. मानवी जीवनाचे आधार असणाऱ्या प्रत्येक घटकांवर शिक्षणाचा प्रभाव दिसून येतो. जसे व्यवसाय, शेती, शेअर मार्केट, वाणिज्य, वैद्यकिय, अवकाश असो किंवा अगदी शेती, घरकाम, मजुरी प्रत्येक घटक शिक्षणामुळे प्रभावित झालेला दिसून येतो.

     विनोबा भावेच्या मते 'सुप्त व निद्रिस्त शक्ती जागृती करण्याचे एक साधन महणजे शिक्षण होय (कुंडले. १९९६) तसेच महात्मा फुले हे ही शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना अतिशय सुंदर शब्दांत म्हणतात की,

विद्येविना मति गेली। मतीविना निती गेली ।। नितिविना गति गेली। गतिविना वित्त गेले । वित्तविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने झाले ।।

             शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व महात्मा फुले यांनी मार्मिकपणे पटवून दिले आहे. (ठोंबरे, २०१६) शिक्षण हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी सर्व घटकांकडून प्रयत्न होत आहे. मात्र असे असताना ही समाजातील काही पटक आज ही कमी अधिक प्रमाणात दुर्लक्षित असल्याचे निदर्शनास येते.

      उदा. अपंग, महिला, आदिवासी समाज, अल्पसंख्याक पटक या पासून वंचित राहू नये यासाठी विविध योजना राबविण्यात आल्या किंबहुना अजूनही येत आहे. अविकसित, दुर्लक्षित अशा अनेक घटकांपैकी एक घटक म्हणजे आदिवासी समाज या समाजाला प्रगत समाजासोबत पुढे नेण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असून त्यासाठी शासनातर्फे विविध मार्गाच्या अवलंब करून दिली जात आहे. या संधीचाच एक भाग म्हणजे 'आश्रमशाळा' या आश्रमशाळा आज दुर्गम, आदिवासी समाजातील मुलांसाठी शिक्षण प्राप्त करण्याचे महत्त्वपूर्ण साधन ठरले आहे.

     विविधतेने नटलेल्या या देशात प्रत्येक समाजातील, प्रत्येक घटकाला विकासाची समान संधी भारतीय राज्यघटनेने उपलब्ध करून दिली आहे. अनेक हक्क राज्यघटनेने दिले आहेत असे असताना ही या हक्काचा या संधीचा लाभ समाजातील दुर्लक्षित घटक घेतातच असे नाही

     आदिवासी समाज हा आज ही 'दुर्लक्षित समाज' म्हणून ओळखला जातो. या समाजाला प्रगत समाजाच्या बरोबरीने वाटचाल करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असून या पर्यायाच्या उपलब्धतेसाठी आज सर्वोतोपरी प्रयत्न होताना दिसत आहेत मात्र असे असताना ही काही प्रमाणात हा समाज आज ही विकसित या शब्दांच्या पलिकडे आहे.

     मानवाचे राहणीमान उंचावणाऱ्या या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या पंखांनी मानवाचे समृध्दीच्या नभात गरुडहीप केवळ शिक्षण या घटकांमुळे शक्य झाली आहे. आज अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण ही सुध्दा मुलभूत गरज बनली आहे आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी सर्वातोपरी सर्व स्तरांतून प्रयत्न होत आहेत.

         शिक्षण या संकल्पनेकडे समाज परिवर्तनाचे साधन म्हणून पाहिले जाते. शिक्षणामुळे जिवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये अमूलाग्र बदल घडून आलेला दिसतो. पूर्वीच्या काळी शिक्षण ही प्रकिया लेखन बाबन या क्षमतापुरतीच मर्यादित होती मात्र ही संकल्पना आज विस्तारत आहे. शिक्षणामुळे आज मानवाला अशक्यप्राय वाटणाल्या अनेक गोष्टी सहज सुलभ होत आहेत. मानवाला गरुडपंख देणाऱ्या या शिक्षणामुळे सामाजातील प्रत्येक घटक क्रियाशील होणे अपेक्षित आहे. मानवी जीवनाचे आधार असणाऱ्या प्रत्येका घटकांवर  शिक्षणाचा प्रभाव दिसून येतो. जसे व्यवसाय, शेती, शेअर मार्केट, वाणिज्य, वैद्यकिय, अवकाश असो किंवा अगदी शेती, घरकाम, मजुरी प्रत्येक घटक शिक्षणामुळे प्रभावित झालेला दिसून येतो.

..... शब्दांकन 

 पुष्पा शिवराम लांडे 

( एम.ए.एम.एड...एम.फिल...सेट..नेट)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 

शिळवंडी. तालुका- अकोले.. जिल्हा -अहमदनगर 

   




0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post