बदल नवीन शिक्षणातील....,. ...पुष्षा लांडे

 


अहमदनगर: अनुकरण करण्यामध्ये स्वतंत्र विचार रुजवणं अवघड असतं, पण त्याच वेळी हेही लक्षात घ्यायला हवं, जोपर्यंत आपल्याकडे वर्तनवादी शिक्षण पद्धती आहे, तोपर्यंत स्वतंत्र विचार होणे शक्य नाही, त्यासाठी रचनावादी शिक्षण पद्धती असायला हवी. त्याचबरोबर लहानपणापासून आपल्या मुला मुलींना अमूर्त पातळीवर विचार करण्याची सवय कशी लावता येईल आणि त्यांचा रियाज करण्यात त्यांना आनंद कसा मिळेल?  हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या गोष्टी आपल्याला समोर दिसत नाहीत अशा गोष्टींवर विचार करणं अपेक्षित आहे. असा सराव, सवय मग आपल्यात जे दिसत नाही, अशा गोष्टींवर विचार करणे अपेक्षित आहे. अशा सरावाची सवय मग आपल्याला जे दिसत नाही त्यांच्या पलीकडचा विचार करण्याची शक्ती देऊ शकेल. या दोन्ही गोष्टी रुजवून घेणे फार महत्त्वाचे आहे. अर्थात हे अमर्यादित काळातलं काम नाही ती एक अनोखी प्रक्रिया आहे सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे ती खंडित झाल्याचेच दिसते. आपण जाणीवपूर्वक ती प्रक्रिया वाहती ठेवली पाहिजे. 

        विशेषतः नोबेल पुरस्काराबाबत आपण विचार करतो आहोत. तर हे प्रथम लक्षात घ्यायला हवे की हा पुरस्कार मिळवण्याची काही एक ठराविक पद्धत आहे. ज्यांना आज पर्यंत नोबेल पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या जीवन प्रवासावरून हे लक्षात येते की त्या व्यक्ती या पुरस्कारासाठी जन्मताच: तयार होत्या असं अजिबात नाही. 

ज्या समाजाच्या स्वतंत्र विचारांना वाव मिळतो, प्रज्ञा संवर्धन होऊ शकेल असे स्वतंत्र विचार मांडण्याचे स्वागत होते, प्रयोग करण्यासाठी मुक्त वाव मिळतो व अपयशाची भीती नसते, अशा समाजात नोबेल पुरस्कार विजेते अधिक आहेत. जे समाज विचारांनी बंदिस्त आहे तिथे ही संख्या नगण्य आहे. या अनुषंगाने शिक्षण पद्धतीत विचारला तर तो एकोत्तरी प्रश्नांचा अंतर्भाव आहे, प्रभाव आहे, तिथे स्वतंत्र उत्तरांना, विचारांना संधी कशी मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर ठरलेले आहे. ते लक्षात ठेवून तू सांगायला हवं किंवा पेपरात लिहायला हवं तरच वरच्या श्रेणीत तू जाशील त्यातूनच तुला नोकरीच्या किंवा प्रगतीच्या संधीची दार उघडणार आहेत. ही बंदिस्त समाजाची लक्षणे आहेत. प्राथमिक पासून ते पदवी पर्यंत एकोत्तरी प्रश्नांना महत्त्व दिलं जातं हा अत्यंत मोठा दोष आपण आपल्या शिक्षण पद्धतीतून परीक्षा पद्धतीतून आणि एकूणच विचार प्रक्रियेतून दूर करणारा नसून तर या नोबेल सारख्या जागतिक पातळीवरील सर्वात प्रतिष्ठेच्या पुरस्कारापासून आपण लांबच राहू कारण अशा शिक्षण पद्धतीत आपण यांना ज्ञानाकडे आपला प्रवास सुरू होत नाही. त्यासाठी खुल्या प्रश्नांची विविध अंगी उत्तर शोधण्याचा सराव आवश्यक असतो अर्थ आपल्याला कधीच नोबेल पारितोषिक मिळणार नाही असा अगदी निराशावादी निष्कर्ष काढायला नक्की पण हे ठामपणे आणि लक्षात घेऊ या की व्यावहारिक पातळीवर क्रांतिकारक घटना घडल्या नाहीत तर सध्याची शिक्षण पद्धती आणि परीक्षा पद्धती नजीकच्या आणि भविष्यकाळात तरी बदलणार नाही. मग या शिक्षण पद्धती पासून पुढे येणाऱ्यातले शास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक नोबेल पर्यंत कसे पोहोचतील ? निदान नामांकनांच्या पातळीवर तरी कसे जातील हे आपल्याला शोधावं लागेल. 

काम करतानाच अनुभवांती मला सुचलेला एक व्यावहारिक आणि प्रभावी तोडगा असा आहे की किशोर वैज्ञानिक पुरस्कार योजना हा एक प्रयोग आपण सुरू केला आहे. त्यात निवड झाल्यास एककोत्तरी प्रश्नांना सामोरे न जाता ऐसर मध्ये प्रवेश मिळून आयटीमध्ये इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतो व शिक्षण क्रमात त्यांनी स्वतंत्र विचार प्रयोग नामवंत शास्त्र आणि शिक्षण तज्ञांनी ते दर सहा महिन्यांनी प्रत्यक्ष पडताळून पाहिले त्यांना आपल्या समक्ष पदवी देता येईल का? विचार व्हायला हवा! प्रश्न आहे तो अशा प्रज्ञावंतांना सध्याच्या अवस्थेत देखील अनुकूल वातावरण देण्याचा स्वतंत्र विचाराची संस्कृती रुजवण्याचा त्यासाठी गरज आहे ती शिक्षण पद्धतीच्या बायपास सर्जरीची ती करणारी तज्ञ ही आपल्याकडे आहेत त्यासाठी धोरणात्मक निर्णय हा सरकारने घ्यायला हवा लहानपणी सागरा प्राण तळमळला ही कविता देशभक्तीने छाती फुगून फुगून जाणारी आपल्या जुन्या संस्कृतीची अभिमानी मंडळी आणि त्यांची मुलं कॉलेजमध्ये गेल्यावर मराठीला भारताला आणि एकूणच भारतीयत्वाला कमी लेखायला लागतात आणि अमेरिकेला जाऊन भारताला कमी लेखतात. आणि ज्यांना जमत नाही ते मात्र वेगळ्या अर्थाने अमेरिकेकडे नेणाऱ्या समुद्राकडे डोळे लावून सागरा प्राण तळमळला म्हणत बसतात.....

शब्दांकन.....

 पुष्पा शिवराम लांडे 

( एम. ए. एम. एड..... एम. फिल..सेट..नेट )

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 

शिळवंडी तालुका- अकोले जिल्हा - अहमदनगर 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post