नगरमध्ये ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखाची दादागिरी

 


हॉटेल उदयनराजेच्या मालकास कशाततरी गुंतवतो असे म्हणत एकला शहर सोडून जाण्याची दिली धमकी / कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल 

माय नगर वेब टीम 

अहमदनगर - नगर शहरामध्ये धक्कादायक बातमी समोर आली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, उद्योजक रमाकांत गाडे यांनी एकला शहर सोडून जाण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. वेटर प्रिंसकुमार हरिनारायण सिंग याने राकेश सिंग, शशिकांत गाडे, युवराज गाडे, रमाकांत गाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. 

सविस्तर हकिगत अशी की, प्रिंसकुमार हा हॉटेल यश पॅलेश येथे वेटर म्हणून कामाला होता. सहा महिन्यापूर्वी त्याने तेथील काम सोडले असून सध्या तो हॉटेल उदयनराजे येथे वेटर म्हणून काम करत आहे. याचा राग मनात धरुन राकेश सिंग याने त्यास फोनवरुन शिवीगाळ केली. तसेच शशिकांत गाडे, युवराज गाडे, रमाकांत गाडे यांनीही शिवीगाळ केली. व तक्रादार, मालकास व मॅनेजरला कशाततरी गुंतवतो असे म्हणत वेटर प्रिंसकुमार यास नगर शहर सोडून जाण्याची धमकी दिली. 

यावरुन कोतवाली पोलिस ठाण्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, उद्योजक रमाकांत गाडे यांच्यासह चौघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post