आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकात्याने जिंकला आणि तेव्हापासून पकड मिळवली ती शेवटपर्यंत राहिली. कोलकात्याने दिल्ली कॅपिटल्सला 107 धावांनी पराभूत केलं.
आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सला दणका दिला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी स्वीकारली. फलंदाजी करताना पहिल्या षटकापासूनच गोलंदाजांवर भारी पडले. दिल्ली कॅपिटल्स संघ एका एका विकेटसाठी धडपड करताना दिसले. मात्र सुनील नरीनने त्यांना संधीच दिली नाही. तसेच चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सुनील नरीने 39 चेंडूत 7 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 85 धावा केल्या. तर अंगरिश रघुवंशी याने 27 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले. रसेलनेही आक्रमक खेळी करत 19 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकार मारत 41 धावा केल्या. कोलकात्याने 20 षटकात 7 गडी गमवून 272 केल्या आणि विजयासाठी 273 धावा दिल्या. पण दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात सर्व गडी गमवून 166 धावा करता आल्या. कोलकात्याने दिल्लीचा 106 धावांनी पराभव केला. तसेच गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली.को
कोलकात्याने विजयासाठी दिलेल्या 273 धावांचं आव्हान गाठताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या 21 धावा असताना पृथ्वी शॉ 10 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या मिचेल मार्श आणि अभिषेक पोरेल यांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर डेविड वॉर्नर स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. दोन सामन्यानंतर स्टार्कला विकेट घेण्यात यश आलं हे विशेष. ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत काही अंशी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 25 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर अक्षर पटेल फलंदाजी आला. मात्र फक्त एक चेंडूसाठी हजेरी लावून शून्यावर बाद झाला. त्यानंतर तळाचे फलंदाजही झटपट बाद होत गेले आणि 107 धावांनी दारूण पराभव झाला.
Post a Comment